ना शिक्षण- ना डीग्रीची अट, आठवड्यांत फक्त 4 दिवस काम करुन मिळतो दीड कोटी पगार

traffic
ऑकलँड – आपल्या देशात नोकरी मिळविण्यासाठी तरुणाईला तारेवरची कसरत करावी लागते आणि त्यातच जर सरकारी नोकरी हवी असेल तर त्यात अटी, नियम आणि शिक्षण हे असावेच लागते. पण या जगात असा एक देश आहे जेथे जॉबसाठी ना डीग्रीची गरज किंवा ना खास क्वालिफिकेशनही लागते. त्याचबरोबर आठवड्यातून चार दिवस काम कराव्या लागणाऱ्या या जॉबसाठी दीड कोटींचा पगार दिला जातो. एवढे सगळे असूनही हा जॉब करणाऱ्या लोकांचा तुटवडा आहे. आम्ही न्यूझीलंडच्या एअर ट्राफिक कंट्रोलची चर्चा करत आहोत. नोकरीसाठी या कंपनीची फक्त एक अट आहे ती म्हणजे नोकरी करणाऱ्याचे वय 20 वर्षांपेक्षा जास्त हवे.
traffic1
फ्लाइट्सच्या ट्राफिक कंट्रोलचा हा जॉब आहे. या कामासाठी क्वालिफिकेशची कोणतीही अट नाही. कंपनीचे असे म्हणणे आहे की, लोकांना हा जॉब करू शकत नाही असे वाटते असल्यामुळे लोकांची याठिकाणी कायम कमतरता जाणवत असते. हे कामच असे असल्यामुळे याठिकाणी एवढी जास्त सॅलरी दिली जाते.
traffic2
याबाबत माहिती देताना न्यूझीलँडचे एअरवे ट्राफिक मॅनेजर टिम बोयले म्हणाले की, उमेदवार वयाच्या अटीमध्ये बसतो की नाही हे आम्ही आधी पाहतो. कोणत्याही डीग्रीची त्याच्यासाठी गरज पडत नाही. आम्ही फिटनेस पाहिल्यानंतर त्याला एक ट्रेनिंग देतो. त्याआधारे हा जॉब मिळतो. टिम म्हणाले, सुमारे 12 महीन्यांच्या पेड ट्रेनिंग दरम्यान उमेदवारांना काही लॉजिकल सिक्वेन्स दाखवले जातात. एखाद्या कोड्याप्रमाणे ते असतात. त्यात विचारले जाते की, कोणत्या सिक्वेन्सने सिरीज पूर्ण होईल. फक्त याच आधारावर व्यक्तीची निवड केली जाते. पण हे प्रत्येकाला शक्य होत नाही. कारण या प्रक्रियेत 300 लोकांमधून सरासरी एक व्यक्ती निवडला जातो.

Leave a Comment