बॉथम यांच्या विक्रमाशी जेम्स अँडरसनची बरोबरी

james-anderson
ब्रिजटाउन – क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा धमाल करत इंग्लंडचा अव्वल वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने नवा विक्रम रचला आहे. २७ वेळा एका वेळेस ५ अथवा त्यापेक्षा जास्ता गडी बाद करण्याचा विक्रम या अनुभवी गोलंदाजाने केला आहे. या विक्रमासह त्याच्याच देशातील माजी दिग्गज गोलंदाज इयान बॉथम यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.


विंडीजचा संघ जेम्सच्या या धारदार गोलंदाजीमुळे २८९ धावांवर गुंडाळला गेला. पण इंग्लंडच्या संघास या संधीचा फायदा घेता आला नाही. त्यांचाही संघ केमार रोचच्या गोलंदाजीपुढे घुडगे टेकला आणि अवघ्या ७७ धावांवर डाव आटोपला. अँडरसनने अलजारी जोसेफ याची विकेट घेत इंग्लंडकडून सर्वाधिक डावात ५ किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेण्याचा पराक्रम केला. या विक्रमासोबत त्याने इयान बॉथम यांच्या विक्रमांशी बरोबरी केली आहे. त्याने मागील दौऱ्यात बॉथम यांच्या ३८३ बळीचा विक्रम मोडला होता. या दौऱ्यात त्याने सर्वाधिक वेळा ५ गडी बाद करण्याच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. त्याने पहिल्या डावात ४६ धावा देत ५ गडी बाद केले आहे. या बळी सह त्याचे आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५७० बळी झाले आहेत.

Leave a Comment