मोदींकडे अर्ज करत बायकोचा खून करण्यासाठी मागितली दोन दिवसांची सुट्टी

letter
पटना – कोणत्याही क्षेत्रातील कर्मचारी सुट्टी मिळवण्यासाठी कधी खरे तर कधी खोटे कारणे सांगतात. पण आता सुट्टी न मिळाल्याने वैतागलेल्या बँक मॅनेजरने पंतप्रधानांसह अनेक अधिकाऱ्यांना पत्र लिहून सुट्टीसाठी अर्ज केला आहे.

पण सुट्टीसाठी या बँक मॅनेजरने दिलेल्या कारणामुळे सगळेच चक्रावले आहेत. सध्या सोशल मीडियावर सुट्टी मिळण्यासाठी केलेल्या रजा अर्जाचा फोटो व्हायरल होत आहे. त्याने आपल्या रजेच्या अर्जात बायकोचा खून करुन तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी फक्त दोन दिवसांची सुट्टी द्या असे म्हटले आहे. विशेष म्हणजे त्याच्या या रजा अर्जाला मंजूरी देण्यात आली आहे.
letter1
सुट्टीसाठी बँक अधिकारी, मुख्यमंत्री, मानवाधिकार आयोग आणि राष्ट्रपतींकडे बँक मॅनेजरने रजा अर्ज पाठवला होता. हा अर्ज बिहारच्या एका ग्रामीण बँकेत काम करणाऱ्या मुन्ना प्रसाद यांनी केला होता. बायको आजारी असल्याने तिच्यावर उपचारासाठी त्याला सुट्टी मिळत नव्हती. शेवटी त्याने असा अर्ज करण्याचा मार्ग निवडला. बँक अधिकाऱ्यांनीही या प्रकरणी ही चिंतेची बाब असल्याचे म्हटले आहे. ग्रामीण बँकेच्या जिल्हा समन्वयकांनी संबंधित कर्मचारी सुट्टीनंतर कामावर हजर झाला असल्याचे सांगितले.

Leave a Comment