शाहिद कपूरच्या शूटींग दरम्यान झाला मोठा अपघात, एकाचा मृत्यू

Shahid-Kapoor
डेहराडून – अभिनेता शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंह’ चित्रपटच्या शूटींग दरम्यान मोठा अपघात झाला आहे. या चित्रपटाचे शूटींग उत्तराखंडमधील डेहराडून येथे सुरू आहे. यावेळी विद्युत जनरेटरमध्ये अडकल्यामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.

या चित्रपटाच्या शूटींगसाठी डेहराडूनहून एक जनरेटर मागवण्यात आले होते. जनरेटर सुरू करीताना त्याचा टेक्नीशियन राजकुमार हा पंख्यामध्ये अडकला. यात त्याला गंभीर दुखापत झाली. तातडीने त्याला मसूरमधील सेंट मेरी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला डेहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात हालवण्याचा सल्ला दिला. मात्र मॅक्सच्या डॉक्टरांनी राजकुमारला मृत घोषीत केले. राजकुमारचे पार्थिव पोस्ट मार्टेमला पाठवण्यात आले आहे.
पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.

Leave a Comment