…म्हणून पत्नीला भेट दिलेल्या 55 हजार ड्रेसची केली विक्री

NEW-rocd
बर्लिन- महिलांना नवनवीन कपड्याची खरेदी करण्याची खुप आवड असते. जर्मनीत एका व्यक्तीने पत्नीला आजवर तब्बल ५५ हजार ड्रेस भेट दिले आहेत. एकदा घातलेला ड्रेस पत्नीला पुन्हा घालण्यास आवडत नव्हता, म्हणून पतीने तीला ड्रेस भेट केले होते. परंतु आता या ड्रेस विक्री करण्यास सुरूवात झाली आहे. कारण हे ड्रेस ठेवण्यासाठी त्यांना जागाच अपुरी पडते आहे.

पॉल ब्रॉकमॅन यांनी हे सर्व ड्रेस ५० फूट लांबीच्या एका कंटनेरमध्ये खास डिझाइन केलेल्या अल्मारीत ठेवले होते. अमेरिकेतील अॅरिझोना येथील इस्ट मेसामध्ये ते राहतात. एवढ्या प्रमाणात ड्रेस विकत घेतल्यामुळे त्यांचे नाव गिनिज बुकात नोंदले गेले आहे.

पॉल ब्रॉकमॅन सांगतात की, त्यांची व मारगोटची पहिली भेट एका डान्स हॉलमध्ये झाली होती. भेटीचे रुपांतर प्रेम झाले, नंतर त्यांनी लग्न केले. त्यानंतर ड्रेस भेट देण्याचा सिलसिला सुरू झाला. आम्हाला ५० च्या दशकातील फॅशन आवडते. या काळात पेटीकोट व स्कर्टस््ची फॅशन होती. बहुतांश ड्रेस सेलमध्ये घेतलेले आहेत. वैवाहिक आयुष्याच्या ६१ वर्षात त्यांनी मारगोटला सेकंड हँड ड्रेसेसपासून विंटेज ड्रेस भेट दिले. कारण दोघांनाही ५० च्या दशकातील फॅशन आवडते.

२०१४ नंतर ब्रॉकमॅन यानी ड्रेस विकत घेणे बंद केले. कमी किंमतीत ड्रेस मिळावेत म्हणून सिअर्स या अमेरिकी डिपार्टमेंट स्टोअर्सशी ब्रॉकमॅन यानी करारही केला होता. या स्टोअर्समधून सेल सुरू होण्याआधीच ड्रेस विकत घेण्यासाठी ब्रॉकमॅन फोन करुन ड्रेस विकत घेत होते.

Leave a Comment