विवो अपेक्स २०१९च्या कॉन्सेप्ट मॉडेलची घोषणा

vivoapex
चीनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी विवोने त्यांच्या लेटेस्ट विवो अपेक्स २०१९ फोनची घोषणा केली आहे. शानदार डिझाईन आणि एकदम नव्या फिचर असलेल्या हे कॉन्सेप्ट मॉडेल पुढील महिन्यात बार्सिलोना येथे होत असलेल्या मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेस मध्ये सादर केले जाणार आहे. हा फोन ५ जी सपोर्ट करेल आणि त्यालाही चार्गिंग होल, बटण असणार नाही.

या फोनला ६.३९ इंची एमोलेड डिस्प्ले दिला गेला असून १२ जीबी रॅम दिली गेली आहे. २५६ जीबी आणि ५१२ जीबी अश्या दोन स्टोरेज व्हरायटी असतील. फोनला मॅग्नेटिक कनेक्टर दिला गेला असून त्याचा वापर फोन चार्ज करणे आणि डेटा ट्रान्स्फरसाठी होणार आहे. या फोनचा पूर्ण डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. त्यामुळे कुठेही टच करून फोन अनलॉक करता येणार आहे.

या फोनला १२ आणि १३ एमपीचे रिअर कॅमेरे दिले गेले आहेत. फ्रंटला पॉपअप कॅमेरा दिला जाणार असल्याचे समजते. फोनचे डिझाईन सुपर युनिबॉडी कर्व्हड ग्लासचे असून सिल्व्हर, ब्लॅक व व्हाईट रंगात तो मिळू शकणार आहे.

Leave a Comment