रिअल माद्रिद जगातील सर्वाधिक श्रीमंत फुटबॉल क्लब

madrid
स्पेनच्या रिअल माद्रिद फुटबॉल क्लबने २०१७-१८ सालात तब्बल ६०७५ कोटी रुपयांचा महसूल गोळा करून जगातील सर्वाधिक श्रीमंत फुटबॉल क्लब यादीत प्रथम क्रमांकावर झेप घेतली आहे. गतवर्षी या यादीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंडच्या क्लब मँचेस्टर युनायटेडची तीन नंबरवर घसरण झाली असून त्यांनी याच काळात ५३०२ कोटी रुपये महसूल मिळविला आहे. दोन नंबरवर स्पेनचाच बार्सिलोना क्लब असून त्यांची कमाई आहे ५५८० कोटी.

दरवर्षी ब्रिटनमधील फर्म डेलॉय जगातील सर्वाधिक श्रीमंत फुटबॉल क्लबचा मनी लीग रिपोर्ट जारी करते. या यादीत टॉप २० क्लबचा समावेश असून या सर्व क्लबचे एकत्रित उत्पन्न ६८,६४० कोटी रुपये आहे. या कमाईत प्रक्षेपण हक्क, व्यावसयिक करार, रोजचा महसूल, तिकीट विक्रीतून मिळणारे उत्पन्न यांचा समावेश असतो. या कमाईत सर्वाधिक वाटा प्रक्षेपण हक्कांचा असून त्याचे प्रमाण ४३ टक्के आहे. या यादीतील पहिल्या २० मध्ये इंग्लंडचे ९, इटलीचे ४ आणि स्पेन, जर्मनी आणि फ्रांसचे प्रत्येकी तीन क्लब आहेत.

Leave a Comment