विद्यार्थ्यांनी बनविलेल्या हलक्या उपग्रहाचे इस्रोकडून प्रक्षेपण

kalam
इस्रोच्या पीएसएलव्ही सी ४४ रॉकेटने गुरुवारी श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून विद्यार्थ्यांनी बनविलेल्या जगातील सर्वात हलक्या उपग्रहाचे प्रक्षेपण करून इतिहास रचला आहे. कलामसॅट या नावाचा हा उपग्रह पृथ्वीच्या वरच्या कक्षेत स्थिर केला जाणार आहे. हा उपग्रह १० सेंटीमीटरचा असून त्याचे वजन १.२ किलो आहे. स्पेसकिड्स या संस्थेतील विद्यार्थ्यांनी तो सहा वर्षाच्या प्रयत्नातून तयार केला असून त्याला १२ लाख रुपये खर्च आला असे समजते. इस्रोच्या या कामगिरीबद्दल पंतप्रधान मोदीनी इस्रोचे कौतुक केले असून देशातील बुद्धिमान विद्यार्थ्यांनी कलामसॅट तयार केल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

या उपग्रहाबरोबर इस्रोने भारतीय सेनेचा मायक्रोसॅट आर उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केला असून या उपग्रहाचे वजन ७४० किलो आहे. तो पृथ्वीच्या खालच्या कक्षेत स्थिर केला गेला आहे. रॉकेटच्या चौथ्या स्टेजचा अंतराळ अभियानात यशस्वी वापर करणारा भारत पहिला देश बनला असून पीएसएलव्ही चे हे ४६ वे उड्डाण आहे.

Leave a Comment