या मंदिरात वाटला जातो बिर्याणीचा प्रसाद

muniannadi
भारतात मंदिरे, देवळे लाखोंच्या संख्येने आहेत. काही मंदिरे प्राचीन म्हणून, काही उत्तम वास्तुशिल्प म्हणून तर काही चमत्कार घडविणारी म्हणून प्रसिद्ध आहेत. तमिळनाडूच्या मदुराई जिल्ह्यातील तीरुमंगलम जवळचे वडक्कमपट्टी मंदिर मात्र वेगळ्याच कारणाने प्रसिद्ध आहे. हे मंदिर मुनियननदीस्वामी मंदिर म्हणून प्रसिध्द असून येथे दरवर्षी साजऱ्या होणाऱ्या तीन दिवसांच्या महोत्सवात प्रसाद म्हणून गरमागरम बिर्याणी दिली जाते.

biryani
मिळालेल्या माहितीनुसार हे मंदिर बरेच जुने असले तर बिर्याणी प्रसादाची परंपरा गेली ८३ वर्षे सुरु आहे. यावर्षी २४ ते २६ जानेवारी या काळात हा महोत्सव होत आहे. त्यासाटी ५०० बकऱ्यांचा बळी देऊन २ हजार किलो बिर्याणी तयार केली जात आहे. शेकडो आचारी त्यासाठी काम करत आहेत. ५० नाव भरून लाकडे आणि मोठमोठी भांडी त्यासाठी जमविली जातात. मंदिराच्या परिसरात मोठमोठ्या हंड्या, मसाले, तांदूळ बटाटे यांचा ढीग लागतो आणि बिर्याणीचा सुवास सर्व गावभर दरवळतो.

हा प्रसाद केवळ मंदिरात येणाऱ्यानाच नाही तर रस्त्यावरून जाणाऱ्यानाही दिला जातो. रात्रभर बिर्याणी बनविण्याचे काम सुरु राहते आणि पहाटे पाच पासून बिर्याणी प्रसाद वाटप सुरु होते. मुनियाननदी स्वामीन संतुष्ट करण्यासाठी हा महोत्सव भरविला जातो असे सांगितले जाते.

Leave a Comment