तामिळनाडूमध्ये या कारणांनी वाढल्या दुध चोऱ्या

dudhchori
तमिळनाडू मध्ये दुधाच्या पिशव्या चोरीस जाण्याचे प्रमाण लक्षणीय रित्या वाढले असून त्याविरोधात दुध संघाने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे येथे एक नवा चित्रपट लवकरच रिलीज होणार असून तेव्हापासून या चोऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे दुध व्यापाऱ्यांना मोठे नुकसान सोसावे लागते आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मागल्वारी सिलाम्बारासन या अभिनेत्याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर रिलीज झाला आहे त्यात त्याने १ फेब्रुवारीला येत असलेल्या त्याच्या सिनेमाचा जल्लोष साजरा करण्यासाठी चित्रपटाच्या पोस्टरवर दुग्धाभिषेक करण्याचे आवाहन केले असून त्याच्या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी लोक दुघाच्या पिशव्या चोरून त्याचा अभिषेक पोस्टरवर करत आहेत.

हिंदू धर्मात देवदेवताना दुग्धाभिषेक करण्याची जुनी परंपरा आहे. त्याला तमिळमध्ये पालभिषेकम म्हणतात. दुध संघाचे अध्यक्ष पोन्नुसामी या विषयी माहिती देताना म्हणाले गेली २० वर्षे येथे सिनेनटांना देवाचा दर्जा देण्याची क्रेझ वाढली आहे. त्यामुळे सिनेमाच्या पोस्टरवर दुधाचा अभिषेक केले जात आहेत. २०१५ पासून आम्ही या अनिष्ट प्रथेविरोधात लढत आहोत पण आम्हाला यश आलेले नाही. नवीन चित्रपट येणार असला कि दुध पिशव्यांच्या चोऱ्या वाढतात. थेट ट्रकमधून पिशाव्या चोरल्या जातात त्यामुळे आमचे नुकसान होते.

Leave a Comment