सिंगल महिलांना कर्मचा-यांना ही कंपनी देते डेटींगसाठी सुट्टी

dating-leave
आजवर आपण आजारपणासाठी रजा, वैयक्तिक रजा आणि प्रसुती रजा असे ऐकले असेल. पण तुम्ही कधी डेटिंगसाठी सुट्टी विषयी ऐकले आहे का? पण ही सुविधा एका कंपनीत खास सिंगल महिला कर्मचा-यांसाठी डेटिंग लिव्ह देत आहे. सुटीचे कारण म्हणजे, या कंपनीत काम करणा-या सिंगल महिला या सुट्यामध्ये पुरुषांना भेटू शकतील आणि आपले लव्ह लाइफ जगू शकतील. या सुट्या चायनातील जेहिआंग शहरातील दोन कंपन्यांमध्ये दिल्या जात आहेत. लुनर न्यू ईयर ब्रेकदरम्यान येथे 7 दिवसांची डेटिंग लीव्ह देण्यात येते.

या कंपनीच्या एचआरनुसार जास्तीत जास्त महिला येथे आउटफिट डेस्कवर काम करत असल्यामुळे त्या जास्त काळ बाहेर घालवू शकत नाही. यामुळे त्या महिला कर्मचा-यांना या सुट्या दिल्या जातात. त्या यामुळे पुरुषांना भेटू शकतील आणि डेट करु शकतील. त्याच बरोबर याच शहरातील Dinglan Experimental Middle School नावाच्या एका मिडिल स्कूलमध्ये प्रत्येक महिन्यात शिक्षकांना हाफ डे दिला जातो. याला Love Leave असे नाव दिले गेले आहे. सिंगल शिक्षकांना आपल्या प्रेमींसोबत वेळ घालवण्याची संधी मिळावी यासाठी हा हाफ डे दिला जातो.

Leave a Comment