शिवसेना खासदारांची ‘मन की बात’, भाजपशी ‘जुळवून’ घ्या !

combo
नवी दिल्ली : अवघे चारच महिने लोकसभा निवडणुकीला उरले आहेत. विरोधकांची भाजप विरोधात महाआघाडी तयार होत आहे. तर पण अजूनही भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे युतीबाबत अजुन ठरत नाही. युतीसाठी भाजप आग्रही आहे तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आपला निर्णय अद्याप गुलदस्त्याच ठेवला आहे.

अशी अनिश्चितता असताना शिवसेनेच्या खासदारांची धडधड वाढली आहे. भाजपशी युती झाली तरच फायद्याची असल्याची भावना शिवसेनेच्या बहुतांश खासदाराची असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. शिवसेना खासदारांच्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात झालेल्या संसदीय पक्षाच्या बैठकीत खासदारांनी युती झाली तरच सेनेला फायदा होईल अशी भावना व्यक्त केली होती. शिवसेना स्वबळावर लढली तर जास्त नुकसान होईल असे मत या बैठकीत व्यक्त झाले.

भाजपसोबत 2014 मध्ये युती होती, त्यामुळे शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले. युती झाली नाही तर तेवढेही खासदार निवडून येणार नाहीत अशी भीती खासदारांना वाटते. राज्यात 2014 नंतर भाजपची ताकद वाढली ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे त्याकडे डोळेझाक करता येणार नसल्याचे खासदारांना वाटते. भाजप आणि शिवसेना वेगळे लढले तर त्याचा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला होऊ शकतो. त्याचबरोबर हिंदू मतांमध्येही फुट पडू शकते अशी भीती शिवसेनेच्या खासदारांना आहे.

Leave a Comment