बांगलादेशच्या एकदिवसीय संघात शब्बीर रहमानची वापसी

shabbir-ahmed
ढाका – न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यासाठी बांगलादेशने संघाची घोषणा केली असून त्यामध्ये मधल्या फळीतील फलंदाज शब्बीर रहमान याला संघात स्थान देण्यात आले आहे.

यापूर्वी शब्बीरवरील निलंबनाची कारवाईतील एक महिन्याच्या कालावधी कमी करण्यात आली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डने सप्टेंबरमध्ये एका प्रशंसकास सोशल मीडियावर अपशब्द बोलल्यानंतर ६ महिन्यासाठी निलंबित केले होते. या निवडीबाबत बोलताना निवड समितीचे प्रमुख मिनहाजुल अबेदीन यांनी सांगितले की, या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात शब्बीर याचे निलंबन समाप्त होत असल्यामुळे न्यूझीलंड विरुद्ध खेळण्यास तो उपलब्ध होईल. त्यामुळे त्याची निवड करण्यात आम्हाला कोणतीही अडचण नाही. १३ फेब्रुवारी ते २० मार्च दरम्यान बांगलादेशचा संघ न्यूझीलंडचा दौरा करणार असून या दौऱ्यात ३ एकदिवसीय आणि ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.

बांगलादेशचा एकदिवसीय संघ – मशरफे मुर्तजा (कर्णधार), शाकिब अल हसन, तमीम इकबाल, लिटन दास, सौम्य सरकार, मोहम्मद मिथुन, मुशफिकुर रहीम, महमूदुल्लाह रियाद, मेहदी हसन, नईम हसन, मुस्ताफिजुर रहमान, रूबेल हुसैन, मोहम्मद सैफुद्दीन, तास्किन अहमद, शब्बीर रहमान.

बांगलादेशचा कसोटी संघ – शाकिब अल हसन (कर्णधार), महमूदुल्लाह रियाद, तमीम इकबाल, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, लिटन दास, मोहम्मद मिथुन, मुशफिकुर रहीम, मेहदी हसन, नईम हसन, ताइजुल इस्लाम, मुस्ताफिजुर रहमान, अबू जयद, खालिद अहमद, तास्किन अहमद.

Leave a Comment