पेटीएमची ‘ही’ सेवा मिळणार मोफत

paytm
नवी दिल्ली- पेटीएम मनीने एक चांगली सुविधा उपलब्ध करुन दिले आहे. गुंतवणुकदार आता पेटीएम मनी अॅपच्या माध्यमातून सगळे म्यूचुअल फंड गुंवणुकदारांच्या प्रदर्शनवर लक्ष ठेऊ शकते आणि ही सुविधा निशुल्क असणार आहे.

गुंतवणुकदारांना आपल्या कंसॉलिडेटिड अकाउंट स्टेटमेंटला पेटीएम मनीवर अपलोड करून काही मिनीटातच पेटीएम मनी अॅपच्या माध्यतामून आपल्या गुंतवणुकीचा पोर्टफोलियो पाहू शकतील.

कंपनीने म्हटले की, भारतीय म्यूचुअल फंड गुंतवणुकदार एएमसीए बँक, सल्लागार आणि वितरकांच्या माध्यमातून गुंतवणुक करत आले आहेत पण, त्यांना ही सुविधा मिळत नाही की, एकाच जागेवर ते आपल्या गुंतवणुकीची सगळी माहीती पाहू शकतील. पेटीएम माध्यमातून आता 1.80 कोटींपेक्षा जास्त म्यूचुअल फंड गुंतवणुकदार रोज एकाच जागेवर आपली गुंतवणुक केलेल्या पोर्टफोलियोच्या प्रदर्शनावर लक्ष ठेवू शकतात.

Leave a Comment