कंगनाचा ‘मणिकर्णिका’ तब्बल ५० देशांत होणार रिलीज

kangna-ranawat
या आठवड्यात म्हणजेच उद्या अभिनेत्री कंगना राणावत हिची प्रमुख भूमिका असलेला ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. रुपेरी पडद्यावर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या या रणरागिणीची शौर्यगाथा पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट फक्त भारतच नाही तर जगभरातील तब्बल ५० देशांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांशी’ हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. हिंदी व्यतिरिक्त हा चित्रपट तामिळ आणि तेलगू भाषेतही प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट जगभरातील ५० देशांमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी दिली आहे. कंगना झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटात राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत आहे. कंगना व्यतिरिक्त अंकिता लोखंडे, अतुल कुलकर्णी यासारखे मराठी कलाकारही या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. कंगना या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शन क्षेत्रातही पदार्पण करत आहे.

Leave a Comment