बायकोकडून चुकूनही घेऊ नका उधार पैसे, नाहीतर होईल कारवाई

CBDT
नवी दिल्ली- आपल्या कामासाठी आजकाल सर्व लोक मित्र किंवा नातेवाईकांकडून उधार पैसे घेतात. गरज पडल्यावर कधी-कधी बायकोकडूनदेखील पैसे घ्यावे लागतात. पण आता जर तुम्ही तुमचे मित्र, नातेवाईक किंवा बायकोकडून पैसे उधार घेतले तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते.

मनी लॉन्ड्रिंग आणि काळ्या बाजारावर लगाम लावण्यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी)ने आयकर कायद्यामध्ये अनेक संशोधन केल्यानंतर आयकर कायदा कलम 269एसएसनुसार, 20 हजार रूपयांपेक्षा जास्तीचा व्यवहार अवैध असल्याचे जाहीर केले आहे. तुम्ही यात मित्र, नातेवाईक किंवा बायकोकडूनदेखील पैसे नाही घेऊ शकत. 20 हजारांपेक्षा जास्तीचा कॅश व्यवहार जर कोणी केला तर त्याला आयकर कायदा कलम 271डीनुसार दंड भरावा लागेल.

सीबीडीटीच्या नियमांनुसार, 20000 हजार रूपयांपेक्षा जास्तीचे ट्राझॅक्शन स्थावर मालमत्ता खरेदीवेळी नाही करू शकत. हे प्रतिबंध अॅडव्हान्सवर देखील आहेत. त्यामुळे 20 हजार रूपयांपेक्षा जास्तीचे कॅश ट्राझॅक्शन केल्यास खरेदी करणारा आणि विक्री करणाऱ्या अशा दोघांवरही कारवाई होईल. खरेदी करणाऱ्याला त्याचे स्त्रोत विचारले जाईल तर विक्री करणाऱ्याकडून दंड आकारला जाईल.

Leave a Comment