प्रियंका गांधींच्या राजकारण प्रवेशावर काय बोलले संजय राऊत

sanjay-raut
मुंबई – शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी प्रियंका गांधी यांनी राजकारणातील प्रवेशाचे आम्ही स्वागत करतो. देशातील राजकारण त्यांच्या राजकारणातील आगमनाने बदलेल, असे मत व्यक्त केले आहे. प्रियंका गांधींच्या राजकारणातील प्रवेशावर ते बोलत होते. त्यांनी यावेळी गांधी घराण्याचा या देशावर कायम प्रभाव राहिल्याचेही नमूद केले.

राऊत म्हणाले, की नवीन चेहऱ्यामुळे फरक पडतो. मग ते महात्मा गांधी असोत किंवा इंदिरा गांधी किंवा इतर कुणी गांधी परिवारातील व्यक्ती. देशातील राजकारण प्रियंकाच्या राजकारणातील प्रवेशाने बदलेल. ते येत्या काळात दिसेलही. राहुल गांधी यांचा हा अत्यंत चांगला निर्णय आहे. गांधी परिवारासोबत या देशातील जनतेने एक जिव्हाळ्याचे नाते ठेवले आहे. सत्ता असो अथवा नसो पण ते कायम राहिले आहे. निवडणूक जिंकले अथवा हारले तरी त्यांचे नाते कायम असल्यामुळे इंदिरा गांधी यांची या देशात अनेक काळ सत्ता राहिली आहे. यामुळे प्रियंका गांधी यांच्या या आगमनाचा येत्या काळात काँग्रेसला मोठा फायदा होईल.

Leave a Comment