पैशांचा डोंगर उभारून कर्मचाऱ्यांना कंपनीने वाटला बोनस

bonus
बीजिंग – बोनसची कुठल्याही कर्मचाऱ्याला फार उत्सुकता असते. आपल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना काही कंपन्या निर्धारित वार्षिक बोनस देत असतात. तर टार्गेट पूर्ण केल्यानंतर काही कंपन्या वर्षाच्या शेवटी किंवा एखाद्या उत्सवाला बोनस देऊन कर्मचाऱ्यांना खुश करतात. पण, चीनमधील एका कंपनीने कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या बोनसचा पैसा ढीग लावून अक्षरशः डोंगर केला. सध्या जगभरात त्या बोनसचे काही फोटो व्हायरल होत आहेत. आपल्या कर्मचाऱ्यांना या कंपनीने सुमारे 315 कोटी रुपये बोनसच्या स्वरुपात वाटप केले आहेत.
bonus1
चायनीज न्यू इयर हा चीनमध्ये सर्वात मोठा फेस्टिव्हल मानला जातो. भारतात दिवाळीला दिला जाणारा बोनस चायनीज न्यू इयरला चीनमध्ये दिला जातो. जियांगक्षी प्रांतातील नानचंग शहरात असलेल्या एका कंपनीच्या वार्षिक बोनस वाटपाची ही छायाचित्रे आहेत. आपल्या कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी कंपनीने 30 कोटी युआन रोख रकमेचे एक डोंगर उभारला. तसेच आपल्या प्रत्येक कर्मचाऱ्याला ते दिले. या कंपनीचा एक स्टील प्रकल्प आहे. प्रत्येकाला बोलावून आपल्या हाताने प्रकल्पाच्या मालक आणि व्यवस्थापन मंडळाने पैशाने भरलेल्या बॅगा सुपूर्द केल्या. कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर यावेळी आलेल्या हसूला काहीच मोल नव्हते. अनेकांचे डोळे आनंदाने पाणावले होते. यामध्ये एकूणच 5000 कर्मचारी कार्यरत आहेत. अशात प्रत्येकाच्या वाट्याला सरासरी 63 लाख रुपये आले आहेत.

Leave a Comment