व्हिडिओकॉनच्या मुंबई, औरंगाबाद कार्यालयांवर सीबीआयचे छापे

cbi
मुंबई / औरंगाबाद – व्हिडिओकॉनच्या मुंबई आणि औरंगाबाद कार्यालयांवर सीबीआयने छापे टाकले आहे. तपास संस्थेने व्हिडिओकॉन ग्रुपचे न्यूपॉवर रिन्यूएबल्ससह झालेले व्यवहार संबंधित एफआयआर दाखल केला आहे. आयसीआयसीआय आणि व्हिडीओकॉन यांच्यादरम्यान झालेल्या कर्जवाटपासंदर्भात सीबीआयकडून छापा टाकण्यात आले आहे.

व्हिडीओकॉन समूहाचे वेणूगोपाल धूत आणि आयसीआयसीआय बँकेच्या माजी व्यवस्थापकीय संचालिका आणि सीईओ चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या नूपॉवर रिन्युएबलवर केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल केला आहे. व्हिडिओकॉन ग्रुपच्या पाच कंपन्यांना आयसीआयसीआय बँकेने एप्रिल 2012 मध्ये 3,250 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. समूहाने या कर्जातील 86% अर्थात 2810 कोटींची परतफेड केली नाही. त्यानंतर 2017 मध्ये एनपीए घोषित करण्यात आले.

या उद्योग समूहाला कर्ज मंजूर करणाऱ्या समितीमध्ये बँकेच्या तत्कालीन सीईओ चंदा कोचर यांचाही समावेश होता. चंदा कोचर यांच्यावर पक्षपात केल्याचे आरोप लावण्यात आला आहे. त्यांच्या विरोधात लावलेल्या आरोपांची चौकशी करण्यात येत आहे.

Leave a Comment