बच्चन परिवार विकत घेणार नाही राजस्थान रॉयल्समध्ये भागीदारी

amitabh-bachhan
राजस्थान रॉयल्स संघाची भागीदारी विकत घेण्यावर स्पष्ट करताना बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांनी सांगितले, की कोणत्याही संघाची भागीदारी त्यांच्या परिवारातर्फे विकत घेण्याची प्रकिया सुरू नाही. अमिताभ बच्चन यांना मीडियात चाललेल्या बातम्यांविषयी विचारले असता भागीदारी विकत घेण्याच्या बातम्यांना त्यांनी खोटे ठरवले आहे.

अमिताभ बच्चन याआधी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघाचे सहभाग विकत घेण्यास उत्सुक असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. या बाबतची चेन्नईसोबतची चर्चा असफल झाली होती. तर, राजस्थान सोबतची चर्चा काही चर्चांनंतर पुढे जावू शकली नाही. देशातील प्रो कबड्डी लीगमध्ये बच्चन परिवाराने जयपूर पिंक पँथर्सची मालकी आणि इंडियन सुपर लीग या फुटबॉल स्पर्धेत चेन्नईयन एफसी या संघाची भागीदारी विकत घेतली आहे. आयपीएलच्या आगामी हंगामापूर्वी संघाला वित्तीय बळकटी प्राप्त करण्यासाठी संघातील भागीदारी विकण्याचे ठरवले होते. यानंतर, उद्योजक राजीव गोयंका आणि अमिताभ बच्चन यांचे नाव भागीदारी विकत घेण्यासाठी आघाडीवर होते.

Leave a Comment