रायबरेलीतून लढणार प्रियांका गांधी

raebareli
आगामी लोकसभा निवडणूक प्रियांका गांधी रायबरेलीतून लढवतील असे सांगितले जात असून हा मतदारसंघ नेहरू गांधी परिवाराचा बालेकिल्ला आहे. प्रियांका यांच्याकडे उत्तर प्रदेशातील ३३ जागांची जबाबदारी दिली गेली असून त्यात मोदींचा वाराणसी, योगींचा गोरखपूर तर मुलायमसिंग यांचा अजमगड मतदारसंघ समाविष्ट आहे. प्रियांका यांच्यासाठी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी वापरत असलेले नेहरू भवन येथील कार्यालय तयार केले जात असून त्या कामाची सुरवात बुधवारी झाली आहे. प्रियांका याच कार्यालयातून निवडणुकीचे कामकाज करणार आहेत.

नेहरू गांधी परिवारात राजकारणात येणाऱ्या प्रियांका १२ व्या व्यक्ती आहेत. यापूर्वी मोतीलाल, जवाहरलाल, विजयालक्ष्मी पंडित, इंदिरा गांधी, संजय घंधी, राजीव गांधी, मेनका गांधी, सोनिया, वरुण आणि राहुल राजकारणात सक्रीय आहेत. सोनिया यांची तब्येत बरी नसल्याने त्यांनी लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या जागी प्रियांका येत आहेत.

उत्तरप्रदेशात प्रियांका यांच्या राजकारण प्रवेशाने मोदी योगी यांना घेरण्याचा कॉंग्रेसचा पर्यंत असून त्याचा परीणाम देशभरात जाणवेल असा दावा केला जात आहे. सध्या कॉंग्रेसकडे लोकसभेच्या ४५ जागा आहेत अश्यावेळी प्रियांका राजकारणात आल्या आहेत.

Leave a Comment