जॅक मा नी सांगितले यशाचे मंत्र

jack-maa
चीनची बलाढ्य इ कॉमर्स कंपनी अलिबाबाचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन जॅक मा यांनी व्यवसायात यश मिळविण्याचे काही कानमंत्र दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीत सांगितले आहेत. त्याच्या म्हणण्यानुसार व्यवसायात येणाऱ्या दबावांना तुम्ही घाबरत असाल तर तुम्हाला व्यावसयिक होण्याचा हक्क नाही.

जॅक मा यांना यावेळी तुम्ही कुणाची निवड नोकरी देताना करता असे विचारले असता ते म्हणाले, माझ्यापेक्षा स्मार्ट लोकांची मी निवड करतो. ४-५ वर्षात माझे बॉस बनू शकतील अश्यांना मी निवडतो कारण त्यांचे विचार सकारात्मक असतात आणि आयुष्यात ते हार मानत नाहीत. आगामी काळात तज्ञ हि संकल्पना राहणार नाही असेही ते म्हणाले.

घरातील मुलांना नेहमी रचनात्मक विचार करण्याची सवय लावली पाहिजे असे सांगून ते म्हणाले घरातील वडीलधारयांनी मुलांना अश्या गोष्टी करण्यासाठी प्रेरणा द्यायला हवी ज्या मशीन करू शकत नाही. मशीनमध्ये चिप असते तर माणसामध्ये हृद्य. त्यादृष्टीने माणसाची जडणघडण व्हायला हवी. मा म्हणाले मी शिक्षक होतो म्हणून व्यवसायत टिकलो. आपले विद्यार्थी आपल्यापुढे गेले पाहिजेत हि शिक्षकाची इच्छा असते.

व्यावासायची गुपिते सांगताना ते म्हणाले, लोकांना तुमच्या तुलनेत अधिक चांगले बनविण्यासाठी मदत करा. तुम्ही काही बदलू शकत नसाल तर बदल स्वीकारा. मित्रांना कधीही व्यवसायात घेऊ नका कारण मैत्री व्यापारापेक्षा अधिक मौल्यवान चीज आहे. तंत्रज्ञान गरजेचे आहेच पण त्याचा वापर भल्यासाठी करा. चांगले काम करा, पृथ्वीला जर तुम्ही माणूस मानत असला तर तिच्या उदरातून तेल कोळसा काढून तुम्ही तिला जाळत आहात. याचा बदला एक दिवस घेतला जाईल याची जाणीव ठेवा.

Leave a Comment