आता अवकाशातही झळकणार जाहिराती

jahirat
जाहिरात ही ६५ वी कला मानली गेली आहेच आणि जाहिरातींनी अवघे जग व्यापले आहे. टीव्ही, वर्तमानपत्रे, होर्डिंग, इंटरनेट असा तिचा सर्वव्यापी संचार सुरु असतानाचा आता आकाशाला गवसणी घालण्यासाठी जाहिरात क्षेत्र सज्ज होत आहे. रशियातील स्टार्टअप स्टार्ट रॉकेट या कंपनीने अंतराळात जाहिराती करण्याचे स्वप्न पहिले असून त्यासाठी अंतराळात बिलबोर्ड स्थापन केले जाणार आहेत.

या जाहिराती चंद्र सूर्याप्रमाणे अंतराळात चमकतील आणि जगभरात दिसतील. त्यासाठी स्पेस बिलबोर्ड छोट्या उपग्रहांच्या स्वरुपात रॉकेटच्या सहाय्याने अंतराळात पृथ्वीच्या खालच्या कक्षेत स्थिर केले जातील. हे क्यूब अंतराळात चकरा मारतील आणि रात्रीच्या वेळी दिसतील. असे क्यूब २०२१ पर्यंत अंतराला सोडले जातील असे समजते.

या संदर्भात स्टार रॉकेटचे सीइओ सिर्निकोव्ह म्हणाले, जानेवारी २०१८ मध्ये कॅलिफोर्निया मधून रॉकेट लॅबने डिस्को बॉल अंतराळात सोडला त्यावरून त्यांना ही कल्पना सुचली आणि स्पेस मध्ये जाहिराती करण्याचा निर्णय घेतला गेला. अर्थात या प्रकाराला वैज्ञानिकांनी आक्षेप घेतला असून त्यामुळे अंतराळात ट्राफिक वाढेल आणि उपग्रह एकमेकांवर आदळतील अशी भीती व्यक्त केली आहे.

Leave a Comment