पुणेकर विद्यार्थ्याने बनवले समुद्रीय जीवांचे संरक्षण करण्यासाठी जहाजाचे डिझाइन

haaziq-kazi
पुणे – पुण्यातील एका १२ वर्षांच्या मुलाने समुद्रातील प्रदूषण कमी करण्याच्या आणि समुद्रीय जीवांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने एका जहाजाचे डिझाइन तयार केले आहे. त्याने ‘एर्विस’, असे नाव या जहाजाला दिले आहे. या विद्यार्थ्याचे नाव हाझिक काझी, असे आहे.

त्याने एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मी काही डॉक्यूमेंट्रीज बघितल्यानंतर समुद्रीय प्राण्यांवर कचऱ्याचा काय परिणाम होतो, हे माझ्या लक्षात आले. मी यासाठी काहीतरी करायला हवे, असे मला वाटले. आपल्या दैनंदिन आपण आहारात मासे खातो. पण समुद्रात तेच मासे प्लास्टिक खातात. परिणामी प्रदूषण थेट आपल्या पर्यंत येते. मानवी जीवनावरही याचा घातक परिणाम होत असल्यामुळे या जहाजाचे डिझाइन मी तयार केले आहे.
haaziq-kazi1
काझी ‘एर्विस’ची वैशिष्टे आणि कार्यप्रणाली सांगताना म्हणाला, सॉकर एर्विसला जोडण्यात आले आहे. याच्यासहाय्याने केंद्रीत शक्तीचा वापर करून कचरा शोषून घेतला जातो. यानंतर पाणी, समुद्री जीव आणि कचरा वेगळा केला जातो. ही प्रक्रिया झाल्यानंतर पाणी आणि समुद्रीय जीव पुन्हा समुद्रात सोडून दिले जातात. यानंतर कचऱ्याचे पुन्हा पाच भागांत विभाजन केले जाते. विविध माध्यमांच्या सहाय्याने ही कल्पना आंतरराष्ट्रीय स्तरावर ठेवण्याची काझीची इच्छा आहे. तसेच, समुद्रातील कचरा त्यांच्या आकारानुसार या जहाजाच्या तत्रज्ञानाच्या माध्यमाने वेगवेगळा केला जाऊ शकतो, असा दावाही त्याने केला आहे.

Leave a Comment