अमूलने आणले उंटीणीचे दूध

amul
अहमदाबाद – उंटीणीचे दूध दूध आणि दुग्धजन्य उत्पादनात आघाडीवर असलेल्या अमूलने बाजारात आणले असून गुजरातमधील ठराविक बाजारपेठेत हे दूध उपलब्ध होणार आहे.

अहमदाबाद, गांधीनगर आणि कच्छमधील ग्राहकांना अमूल ‘कॅमल मिल्क’ हे खरेदी करता येणार आहे. उंटीणीचे दूध हे पचायला हलके, आरोग्यवर्धक आणि विविध लाभ देणारे असते. तसेच दुधाची अॅलर्जी असणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे. कारण त्यात अॅलर्जीला विरोध करणारे प्रतिरोधक घटक असतात. या दुधात इन्सुली- प्रोटिन असते. त्यामुळे मधुमेह असणाऱ्यांना उंटीणीच्या दुधाचा विशेष फायदा होत असल्याचे अमूलने म्हटले आहे. सुरुवातीला कच्छच्या बाजारपेठेत उंटीणीचे दूध उपलब्ध करण्यात आले आहे. अर्धा लिटर दुधाची किंमत ५० रुपये आहे. वर्षभरापूर्वी अमूलने उंटीणीच्या दुधापासून तयार केलेले चॉकलेट बाजारात आणले आहेत.

Leave a Comment