भारतात एके काळी हजार-दोन हजार नाही…तर 1 लाखाची नोट होती चलनात

currency
देशात नोटबंदीनंतर २ हजार आणि पाचशेची नोट चलनात आली. 1 हजार, पाचशेच्या नोटा त्यापूर्वी चलनात होत्या. तुम्ही यापूर्वी एक, दोन, पाच, दहा, पन्नास, शंभर आणि आता दोनशे रुपयांची नोटही वापरली असेल पण तुम्हाला माहित आहे का की एके काळी देशात एक लाख रुपयांची नोट छापण्यात आली होती.

त्या एक लाख रुपयांच्या नोटेवर गांधीजींचा नाही तर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा फोटो होता. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती आहे. त्यानिमित्ताने आम्ही आज तुम्हाला या एक लाख रुपयांच्या नोटेबद्दल रंजक माहिती सांगणार आहोत. एक लाख रुपयांची नोट नेताजींच्या आझाद हिंद सरकारच्या काळात छापण्यात आल्याची माहिती त्यांचा चालक कर्नल निजामुद्दीन यांनी दिली होती. दहा देशांची मान्यता 1943 ला स्थापन करण्यात आलेल्या आझाद हिंद बँकेकडून चलनात आणलेल्या या नोटेला होती.
currency1
ही नोट आझाद हिंद सरकार आणि सैनिकांना पाठिंबा देणाऱ्या दहा देशांत व्यवहारात वापरता येत होती. बर्मा, क्रोएशिया, जर्मनी, नानकिंग(चीन), मंचूको, इटली, थायलंड, फिलिपाइन्स, आयर्लंड या देशांचा यामध्ये समावेश होता. या नोटेशिवाय आझाद हिंद बँकेने दहा रुपयांचे नाणेही चलनात आणले होते. एक लाख रुपयांची नोट आझाद हिंद बँकेने छापली असली तरी सर्वांना फक्त 5 हजार रुपयांच्या नोटेची माहिती होती. ‘बीएचयू’च्या भारत कला भवनात पाच हजाराची एक नोट ठेवण्यात आली आहे. नेताजींच्या नातेवाईकांकडून एक लाख रुपयांच्या नोटेचा फोटो मिळाला आहे.

नेताजींचे चालक आणि सुरक्षारक्षक म्हणून काम केलेल्या कर्नल निजामुद्दीन यांना 17 रुपये वेतन मिळत होते. आझाद हिंद सेनेच्या लेफ्टनंटला महिन्याला 80 रुपये पगार होता. तर बर्म्युडात तैनात असलेल्या अधिकाऱ्यांना 230 रुपयांपर्यंत पगार दिला जात होता. आझाद हिंद सेनेचा गुप्तचर विभागही होता. पाणबुडीच्या साहाय्याने अनेक गुप्तहेरांना सिंगापूर आणि बँकॉकलाही पाठवण्यात आले होते.

Leave a Comment