मोफत प्रवास घडविणारी जगातील एकमेव ट्रेन भारतात

bhakra
भारतात एक अशी ट्रेन गेली कित्येक वर्षे धावते आहे, ज्यात बसण्यासाठी तिकीट काढावे लागत नाही आणि या रेल्वेत तिकीटचेकर नसतो. ६९ वर्षे सातत्याने वाहतूक करत असलेली ही ट्रेन भाक्रा बियास व्यवस्थापन बोर्डाकडून चालविली जाते असून ती नांगल ते भाक्रा या दरम्यान २५ गावातून जाते.

भाक्रा नांगल हे पंजाब मध्ये बांधले गेलेले देशातील सर्वात मोठे धरण म्हणून प्रसिद्ध आहे.१९४९ साली त्याचे काम सुरु झाले तेव्हा अनेक पहाड फोडून दुर्गम मार्ग धरणाच्या बांधकामासाठी आवश्यक सामान वाहून नेण्यासाठी बांधला गेला तो रेल्वेमार्ग होता. या मार्गावर सुरु केल्या गेलेल्या ट्रेनमधून प्रथम सामानाची वाहतूक केली गेली आणि नंतर बोर्डाने धरणासाठी ज्यांच्या जमिनी घेतल्या त्या लोकांना ही रेल्वे कायम सुरु थावण्यात येईल असे आश्वासन दिले.

धरण बांधताना कोणती आव्हाने पेलावी लागली याची जाणीव पुढच्या पिढ्यांना असावी हाही ही रेल्वे सुरु ठेवण्यामागचा उद्देश आहे. ही रेल्वे हन्डोळा, अलोंडा, स्वमिपूर अश्या २५ गावातून जाते आणि दिवसातून दोन फेऱ्या करते. याचा मुख्य लाभ शहरात शिकण्यासाठी जाणारे विद्यार्थी आणि कामगारांना होतो. या ट्रेन मध्ये विक्रेते नाहीत तसेच तिकीट चेकरही नाहीत.

Leave a Comment