प्रत्यक्षात नसलेल्या मॉडेलची सोशल मिडीयावर क्रेझ

imma
जपानी सोशल मिडीयावर सध्या इम्मा नावाच्या व्हर्च्युअल मॉडेलची जोरदार क्रेझ निर्माण झाली आहे. प्रत्यक्षात अस्तित्वात नसलेल्या या मॉडेलला सोशल मिडीयावर प्रचंड लाईक मिळत असून तिचे १५ हजार फॉलोअर्स आहेत. ही संख्या तीन दिवसात वाढत चालली आहे.

थ्रीडी तंत्रज्ञानाच्या मदतीने संगणकावर बनविलेल्या या मॉडेलचे नामकरण इम्मा असे केले गेले असून सीजी मॉडेल कंपनीने तिला तयार केले आहे. इम्मा वास्तविक २०१८ मध्येच तयार झाली असली तरी तिला आत्ता लोकप्रियता मिळत आहे. सीजी वर्ल्ड मॅगेझीनच्या फेब्रुवारी महिन्याच्या कव्हर पेजवर तिचा फोटो झळकला आणि संपूर्ण जपानमध्ये तिची चर्चा सुरु झाली. यापूर्वीची अशी व्हर्चुअल मॉडेल तयार केले गेली आहेत मात्र इम्मा सर्वात प्रसिद्ध बनली आहे.

Leave a Comment