ट्रम्प यांच्या खोटारडेपणाचा पंचनामा

trampdd
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सतत खोटे बोलत असल्याचे आरोप केले जात आहेत. त्यातच त्यांच्या कारकिर्दीला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वॉशिंग्टन पोस्ट ने फॅक्ट चेकरचा हवाला देऊन गेल्या दोन वर्षात ट्रम्प ८१५८ वेळा खोटे बोलल्याचे अथवा त्यांनी दिशाभूल करणारी वक्तव्ये केल्याचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. फॅक्ट चेकर तर्फे अध्यक्षांनी केलेल्या प्रत्येक निवेदनाचे विश्लेषण आणि वर्गीकरण केले जाते.

या अहवालानुसार ट्रम्प पहिल्या वर्षापेक्षा दुसऱ्या वर्षात अधिकवेळा खोटे बोलले असून हि आकडेवारी आहे ६ हजार. म्हणजे पहिल्या वर्षाच्या तुलनेत ती तिप्पट अधिक आहे. एकून ८१५८ वेळा ट्रम्प यांनी खोटारडी विधाने केली असून त्यात दुसऱ्या वर्षात ६००० विधाने केली आहेत. याचा अर्थ ते दररोज १६ वेळा खोटे बोलले आहेत.

ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची २० जानेवारी २०१७ ला शपथ घेतली.त्यांनी पहिल्या १०० दिवसातच निराधार विधाने केली असून स्थलांतर, परराष्ट्र नीती, व्यापार या बाबतीत ते सर्वाधिक खोटे बोलले आहेत. त्या पाठोपाठ अर्थव्यवस्था, रोजगार यांचा नंबर आहे. त्याच्या दोन वर्षाच्या कारकिर्दीत फक्त ८२ दिवस असे आहेत ज्यात त्यांनी कोणताही दावा केलेला नाही. कारण ते या दिवसात गोल्फ खेळण्यात मग्न होते असेही या बातमीत म्हटले गेले आहे.

Leave a Comment