आयसीसीचे महत्त्वाचे सर्व पुरस्कार विराट कोहलीने पटकवले

virat-kohli1
मुंबई: क्रिकेट जगतात टीम इंडियाचे रनमशीन कर्णधार विराट कोहलीने आपला दबदबा निर्माण केला असून आयसीसी अवॉर्ड्स 2018मध्ये त्याचीच प्रचिती आली. कारण आयसीसीचे महत्त्वाचे सर्व पुरस्कार विराट कोहलीला मिळाले आहेत. विराट कोहलीला 2018 चा आयसीसी क्रिकेटर ऑफ द ईयरचा पुरस्कार मिळाल्यामुळे सर गारफिल्ड सोबर्स चषकाचा तो मानकरी झाला. त्याचबरोबर विराट कोहलीला पहिल्यांदाच सर्वोत्तम कसोटीपटू आणि सर्वोत्तम वन डे खेळाडू पुरस्कार जाहीर झाला.

विराट कोहलीने त्यामुळे अनोखी हॅटट्रिक केली आहे. 30 वर्षीय विराट क्रिकेटर ऑफ द ईयर, टेस्ट क्रिकेटर ऑफ द ईयर आणि वनडे क्रिकेटर ऑफ द ईयर झाला आहे. आयसीसीचे तीनही महत्त्वाचे पुरस्कार कोहलीने मिळवलेच, त्याचबरोबर त्याला आयसीसीचा वन डे आणि कसोटी संघ 2018 चा कर्णधार म्हणूनही निवडण्यात आले. मंगळवारी आयसीसीने आपला 2018 चा एकदिवसीय आणि कसोटी संघ जाहीर केला. विराट कोहलीला या दोन्ही संघांचेकर्णधारपद देण्यात आले.


कोहलीला कर्णधार करण्याचे प्रमुख कारण म्हणजे त्याने केलेली जबरदस्त कामगिरी. 2018 मध्ये कोहलीने 14 एकदिवसीय सामन्यात 9 भारताला विजय मिळवून दिला. भारताने एकूण 14 सामने जिंकले, केवळ चार सामने गमावले तर दोन सामने अनिर्णित राहिले. कसोटीमध्ये विराट कोहली 2018 मध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. कोहलीने 13 कसोटी सामन्यांमध्ये 55.08 च्या सरासरीने 1322 धावा केल्या. ‘आयसीसीच्या वन डे टीम ऑफ द ईयर 2018’ मध्ये विराट कोहलीसह भारताच्या आणखी तिघांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये हिटमॅन रोहित शर्मा, फिरकीपटू कुलदीप यादव आणि मध्यमगती गोलंदाज जसप्रीम बुमराह यांचा समावेश आहे.

आयसीसीचा एकदिवसीय संघ – रोहित शर्मा (भारत), जॉनी बेयरस्टो (इंग्लंड), विराट कोहली (भारत, कर्णधार), जो रूट (इंग्लंड), रॉस टेलर (न्यूझीलंड), जोस बटलर (विकेटकीपर, इंग्लंड), बेन स्टोक्स (इंग्लंड), मुस्ताफिजुर रहमान (बांगलादेश ), राशिद खान (अफगानिस्तान) कुलदीप यादव (भारत), जसप्रीत बुमराह (भारत)

आयसीसीचा कसोटी संघ – टॉम लॉथम (न्यूझीलंड), दिमुथ करुणारत्ने (श्रीलंका), केन विल्यमसन (न्यूझीलंड), विराट कोहली (भारत, कर्णधार), हेन्री निकोल्स (न्यूझीलंड), ऋषभ पंत (विकेटकीपर, भारत), जेसन होल्डर (वेस्ट इंडीज), कॅगिसो रबाडा (दक्षिण आफ्रिका), नॅथन लायन (ऑस्ट्रेलिया),जसप्रीत बुमराह (भारत), मो. अब्बास (पाकिस्तान)

Leave a Comment