मुंबईच्या महापौरांचा राणीबागेतील बंगल्यात गृहप्रवेश

mumbai-mayor
मुंबई – मुंबईतील महापौर बंगला शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी रिकामा करण्यात आल्यानंतर भायखळा येथील राणीबागेतील बंगल्यात मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी गृहप्रवेश केला.

आता यापुढे मुंबईचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांचे वास्तव्य मुंबईतील भायखळ्याच्या प्रसिद्ध राणीबागेतील झाडाझुडपात लपलेल्या बंगल्यात असणार आहे. त्यामुळे महापौर बंगल्याचा पत्ता आता दादर नसून भायखळा असणार आहे. महापौरांनी या बंगल्यात गणेशपूजन करून गृहप्रवेश केला.

हा बंगला ऐतिहासिक वारसा आहे. १९३१ साली हा बंगला बांधण्यात आला. मौजमजेसाठी, पार्टीसाठी या बंगल्याचा ब्रिटीशांनी वापर कॅफेटेरिया म्हणून केला होता. हा बंगला या उद्देशाने उभारण्यात आला होता. हा बंगला १९७४ पासून महापालिकेतील प्रशासकीय अधिका-यांचे निवासस्थान बनला. याआधी या बंगल्यात अतिरिक्त महापालिका आयुक्त असिम गुप्ता यांचे वास्तव्य होते. सध्या येथे महापालिका अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱहाड राहत होते.

Leave a Comment