या अरब देशाने दिली फिमेल व्हायग्राला परवानगी

vigra
इजिप्त – महिलांच्या व्हायग्रासाठी परवानही देणारे इजिप्त हे जगातील पहिले राष्ट्र ठरले असून इजिप्तमध्ये महिलांची कामोत्तेजना वाढवणाऱ्या या औषधाचे उत्पादन सुरू होणार आहे. सामाजिक दृष्ट्या अथ्यंत कट्टर समजल्या जाणाऱ्या या देशाने उचलेले हे पाऊल आश्चर्यकारक आहे. पण असा निर्णय या देशाने का घेतला यामागचे कारणही काहीसे विचित्रच आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार सरकारकडून फिमेल व्हायग्राला सूट मिळण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे येथील वाढणारे घटस्फोट हे आहे. एका सर्वेक्षणानुसार इजिप्तमध्ये वाढलेल्या घटस्फोटांच्या मागे कौटुंबिक समस्यांबरोबरच लैंगिक समस्यांचाही समावेश हेही मोठे कारण आहे.

नेम फ्लिबानसेरिन फिमेल व्हायग्राचे केमिकल असते. या औषधाचे स्थानिक उत्पादक म्हणतात की, देशातील दहामागे प्रत्येक तीन महिलांचे वैवाहिक जीवन उध्वस्त झाले आहे. अनेक मानसिक त्रासांचा सामना त्यांना करावा लागतो. त्यामुळे त्यांचे जीवन अधिक होते. त्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या सेक्स लाइफ आणि रिलेशनवर पडतो. याचमुळे या औषधाबाबत प्रस्ताव देण्यात आला होता. त्याला हिरवी झेंडी दाखवण्यात आली.

Leave a Comment