साधना सिंह यांचा शिरच्छेद करणा-या 50 लाख इनाम देणार बसप नेता

sadhana-singh
लखनौ : बहुजन समाज पक्षचे माजी आमदार विजय यादव यांनी पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजपच्या आमदार साधना सिंह यांचा शिरच्छेद करणाऱ्याला 50 लाखांच्या बक्षीसाची घोषणा केली आहे. एका कार्यक्रमात बोलताना साधना सिंह यांनी मायावतींची तुलना तृतीयपंथीयांशी केली होती.

भाजप नेत्यांचे मानसिक संतुलन समाजवादी पार्टी आणि बसपची आघाडी झाल्याने ढासळले आहे, ते म्हणून बसप अध्यक्षा मायावतींवर खालच्या पातळीवर टीका करत असल्याचे विजय यादव म्हणाले. त्यामुळे जो कोणी भाजप आमदार साधना सिंह यांचा शिरच्छेद करेल त्याला 50 लाखांचे बक्षीस देण्यात येईल, अशी घोषणा त्यांनी केली.

यापूर्वीही विजय यादव यांनी एका कार्यक्रमादरम्यान भाजप नेत्यांना पळवून मारु, असे वक्तव्य केले होते. ते या वक्तव्यामुळे चांगलेच चर्चेत आले होते. त्यांच्या या घोषणेमुळे आता भाजप आणि बसपमधील राजकीय वातावरण चांगलेच तापताना दिसत आहे. मायावतींची साधना सिंह यांनी तृतीयपंथीयांशी तुलना केल्यानंतर त्यांच्यावर टीका सुरु झाली होती. सिंह यांनी या टीकेनंतर माफीनामा सादर केला. सिंह यांनी यामध्ये म्हटले होते की, ‘मी केलेल्या भाषणात मला कोणालाही दुखवायचे नव्हते. माझ्या भाषणातून जर कुणाला वाईट वाटले असेल अथवा दुःख झाले असेल तर त्याबद्दल मी खेद व्यक्त करते.

Leave a Comment