हंगामी संचालक नागेश्वर रावांनी केल्या सीबीआयच्या २० अधिकाऱ्यांच्या बदल्या

nageswar-rao
नवी दिल्ली – २० बड्या अधिकाऱ्यांच्या सीबीआयचे हंगामी संचालक एम. नागेश्वर राव यांनी बदल्या केल्या असून 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या अधिकाऱ्याचाही यामध्ये समावेश आहे.

नव्या सीबीआय प्रमुखांची नियुक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील समितीकडून करण्यात येणार आहे. पण सीबीआयचे हंगामी संचालक नागेश्वर राव यांनी या बैठकीपूर्वीच अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. बड्या २० अधिकाऱ्यांच्या विविध ठिकाणी राव यांनी बदल्या केल्या आहेत. यामध्ये १३ पोलीस अधीक्षक दर्जाचे तर ७ सहाय्यक पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. २४ जानेवारी रोजी नव्या सीबीआयच्या प्रमुखांच्या निवडीसाठी पंतप्रधान मोदी, सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे हे बैठक घेणार आहेत.

ज्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये पोलीस अधीक्षक विवेक प्रियदर्शनी यांचाही समावेश आहे. 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याची ते चौकशी करीत असून महत्वपूर्ण दिल्ली युनिटची जबाबदारी सांभाळत होते. बदल्या करण्यात आलेल्या इतरांमध्ये एटी दुरईकुमार, प्रेम गौतम, मोहित गुप्ता (राकेश अस्थानांच्या जागेवर यांना इनचार्ज बनवण्यात आले होते) या महत्वाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

Leave a Comment