वसंत ऋतूत विरघळून जाणारे आईस हॉटेल

ice-hotel
संपूर्णपणे बर्फातून बनविल्या गेलेल्या हॉटेल मध्ये राहण्याची इच्छा असेल तर १३ एप्रिलपर्यंत वेळ हाताशी आहे. या काळात स्वीडनचे तिकीट काढून तिकडे प्रस्थान ठेवावे लागेल कारण १३ एप्रिलपासून हे हॉटेल बंद होणार आहे. हे आईस हॉटेल दरवर्षी थंडीत बांधले जाते पण वसंतऋतू सुरु झाला कि ते वितळू लागते. यंदा १३ देशातील १४ हुन्नरी कलाकारांनी आणि डिझायनर्सनी ते तयार केले आहे.

अर्थात ज्यांना या हॉटेल मध्ये राहण्याची इच्छा आहे पण सध्या सवड नाही ते नंतरही या हॉटेलचा आनंद लुटू शकतील कारण २०१६ साली या हॉटेलचा काही भाग कायमस्वरूपी बनविला गेला आहे. दरवषी येथे विविध देशातील डिझायनर येऊन नविन स्यूट तयार करतात. कायमस्वरूपी जो भाग तयार केला आहे तेथे सोलर पॉवरवर चालणारी कुलिंग सिस्टीम बसविली गेली असून हे हॉटेल जगभरातील पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. १९९२ साली असे बर्फाचे हॉटेल बनविण्याची सुरवात झाली. येथे एक कॉम्प्लेक्स, रेस्टॉरंट, सेरेमनी होल असून याला लिव्हिंग ओशन स्यूट असे म्हटले जाते. तेथे कोरल्स, मासे आहेत.

Leave a Comment