चेकबुक, एटीएम नसलेली अनोखी बँक

ramnaam-bank
फक्त रामनामाचे चलन आणि त्याबदल्यात व्याज्ररुपाने आत्मिक शांती देणारी, चेकबुक, एटीएमची सुविधा नसणारी एक बँक सध्या प्रयागराज कुंभ मेळ्यात सुरु आहे. रामनाम बँक असेच तिचे नाव असून १ शतकापूर्वी हि बँक तत्कालीन व्यावसायिक ईश्वरचंद्र यांनी सुरु केली आणि आज त्यांचे नातू आशुतोष वार्ष्णेय ती पुढे नेत आहेत. रामनाम सेवा संस्थान तर्फे या बँकेचा कारभार केला जातो आणि या बँकेचे सर्व वयोगटातील आणि सर्व धर्माचे १ लाखापेक्षा जास्त खातेधारक आहेत.

सध्या प्रयागराज कुंभमध्ये सेक्टर ६ मध्ये हि बँक आहे आणि आत्तापर्यंत ९ कुंभमेळ्यात तिची उपस्थिती होती असे आशुतोष यांनी सांगितले. ते म्हणाले आत्मशांतीचा माणसाचा शोध खूप प्राचीन आहे. आमच्या बँकेत पुस्तिकेत रामनाम लिहून ती पुस्तिका जमा करायची. ही पुस्तिका ३० पानी आहे. त्यात १०८ कॉलम असून रोज १०८ वेळा त्यात रामनाम लिहायचे आणि पुस्तिका भरली कि बँकेत जमा करायची. अश्या पुस्तिका संबंधित खातेधारकाच्या खात्यात जमा केल्या जातात त्याचे पासबुक दिले जाते.

या बँकेच्या सर्व सेवा मोफत आहेत. रामनाम पुस्तिकेत लिहिणे याला लिखित जप म्हटले जाते. त्यामुळे मनाला शांती मिळतेच पण सर्व इंद्रिये भगवानाच्या सेवेत गुंततात. या पुस्तिकेत उर्दू, बंगाली हिंदी अश्या कोणत्याची भाषेत रामनाम लिहिता येते आणि अनेक मुस्लीम, शीख अथवा अन्य धर्मीय आमचे सभासद आहेत. शेवटी ईश्वर एकाच आहे, मग त्याला राम म्हणा, रहीम म्हणा, अल्ला म्हणा, येशू म्हणा किंवा नानक म्हणा असेही आशुतोष यांनी सांगितले.

Leave a Comment