लाम्बोर्गिनी अव्हेन्टेडोर एसव्हीजे भारतात लाँच

aventador
लाम्बोर्गिनी अव्हेन्टेडोर एसव्हीजे कार २०१८ सालीच बाजारात आली असली तरी दीर्घ प्रतिक्षेनंतर ती आता भारतात लाँच केली गेली असून या कारची पहिली डिलिव्हरी बंगलोर निवासी ग्राहकाला दिली गेली आहे. या मॉडेलच्या फक्त ६०० कार्स बनविल्या जात असून तिची एक्स शोरूम किंमत ६ कोटी रुपये आहे.

या कारचे डिझाईन एस आणि एसव्ही व्हर्जन पेक्षा अधिक आकर्षक आहे. या स्पोर्ट्स कारला बॉनेटशिवज अतिरिक्त व्हेंटस, मोठे साईड स्कर्ट्स आणि नवा ड्युअल पाईप एग्झोस्ट दिला गेला आहे. या कारला ६.५ लिटर व्ही १२ इंजिन असून ० ते १०० किमीचा वेग ती २.८ सेकंदात घेते. तिचा टॉप स्पीड आहे ताशी ३५० किमी.

Leave a Comment