मोटोरोलाच्या मोटो जी ७ पॉवरची फीचर्स लिक

motog7
मोटोरोला मोटो जी ७ प्लस, जी ७ पॉवर, जी ७ प्ले अशी जी ७ लाईन बाजारात आणण्याच्या तयारीत असून त्यातील मोटो जी ७ पॉवरचे फीचर्स लिक झाली आहेत. टेक रिपोर्ट नुसार या फोनला ५ हजार एमएएच बॅटरी दिली गेली आहे.

रिपोर्टनुसार या फोनला ६.२ इंची एचडी डिस्प्ले, प्रोक्झिमीटी सेन्सर, ग्लास बॅक दिली जात असून ३ जीबी रॅम, ३२ जीबी स्टोरेज तसेच ४ जीबी रॅम, ६४ जीबी स्टोरेज अश्या दोन व्हर्जन मध्ये तो येईल. १२ एमपीचा रिअर आणि ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा, अँड्राईड ९.० पाय ओएस, फिंगरप्रिंट सेन्सर अशी त्याची अन्य फिचर आहेत. ब्राझील मध्ये त्याची किंमत १३९९ रियाल म्हणजे भारतीय रुपयात २६६०० असली तरी भारतात हा फोन १२ हजार पेक्षा कमी किमतीत मिळणार आहे.

Leave a Comment