कैरो मधील घरे एकाचा रंगात रंगविण्याचे आदेश

kairo
इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फतह अल सीसी यांनी कैरो या राजधानीच्या शहरातील सर्व घरे मातकट रंगात आणि किनारपट्टी भागातील घरे निळ्या रंगात रंगविण्याचे आदेश जारी केले आहेत. मार्च पर्यंत या कामासाठी मुदत दिली गेली असून या काळात काम करून घेण्याची जबाबदरी असलेले कर्मचारी आणि घरमालक यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

इजिप्त मध्ये बहुतेक घरे लाल विटांची आहेत. ती रंगविणे ही राष्ट्रीय योजनेचा भाग आहे. राष्ट्रपतींच्या म्हणण्यानुसार वेगवेगळ्या रंगात रंगविलेली घरे शहराचे सौदर्य घालवितात. परिणामी शहर घाणेरडे दिसते. इजिप्त मध्ये फतवे जारी करून त्याची कडक कारवाई करण्याच्या पद्धतीमुळे आधीच देश बदनाम आहे. गरजेच्या वस्तूंवर सबसिडी बंद करणे, त्याविरोधात मूक मोर्च्या काढणाऱ्यांना अटक करणे, गरीब लोकांची शहराबाहेर हकालपट्टी करणे असे अनेक फतवे वेळोवेळी जारी केले गेले आहेत. आता त्यात घरे एकाच रंगात रंगविण्याचा नवा फतवा जारी झाला आहे.

Leave a Comment