भयपटात झळकणार विकी कौशल आणि भूमी पेडणेकर

vicky-kaushal
नुकताच विकी कौशलची मुख्य भूमिका असलेला उरी चित्रपट रिलीज झाला असून प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला. बॉक्स ऑफिस कलेक्शनसोबतच या चित्रपटातील विकी कौशलच्या अभिनयाचेही विशेष कौतुक झाले. विकीने आता यापाठोपाठ आणखी एक चित्रपट साईन केल्याचे म्हटले जात आहे.

याबाबत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा एक भयपट असणार आहे. असे असल्यास हा चित्रपट विकी कौशलचा पहिला भयपट ठरणार आहे. तर भूमी पेडणेकर चित्रपटात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार असल्यामुळे पहिल्यांदाच भूमी आणि विकीची जोडी स्क्रीन शेअर करताना प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

अनेक दिवसांपासून किनाऱ्यावर उभा असणाऱ्या एका जहाजेवर आधारित असणार असल्याचे या चित्रपटाची कथा म्हटले जात आहे. दरम्यान अद्यापही चित्रपटाचे शीर्षक आणि इतर माहिती गुलदस्त्याच आहे. पण चित्रपटाच्या शूटींगला सुरूवात झाली असून बराच भाग चित्रीत झाला असल्याचेही समोर येत आहे. करण जोहर याची निर्मिती करत आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन भानुप्रताप सिंग करणार आहेत.

Leave a Comment