बैलामुळे लग्न न करण्याचा घेतला ‘या’ महिलेने निर्णय

bull
आयुष्यात लग्न ही आवश्यक नाही, परंतु आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग नक्कीच आहे. व्यक्ती स्वत: च्या किंवा कुटुंबाने पंसत केलेल्या व्यक्तीशी लग्न करतात. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा लग्न हा सुंदर क्षण असतो. जगभरातील असेही काही लोक आहे की ते आपले ध्येय गाठण्यासाठी आयुष्यभर अविवाहीत राहतात. डॉ. एपीजे अब्दुल कलाम याचे उत्तम उदाहरण आहे.

bull3

आज आम्ही तुम्हाला एका अशाच महिलेबद्दल सांगणार आहोत की जिने आयुष्यात लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. तमिळनाडुच्या एका महिलेने तिची आवड पूर्ण करण्यासाठी विवाह करण्यास नकार दिला आहे. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की, या महिलेने केवळ एका बैलामुळे आयुष्यभर लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे.

bull1

साधारणता व्यक्ती कोणत्या तरी मजबूरी असल्यामुळे लग्न करत नाही. परंतु या महिलेने बैलाचे दुखणे बघून लग्न करण्यास नकार दिला आहे. 48 वर्षीय सेल्वरानी ही तमिळनाडू राज्याच्या मदुराईमध्ये राहत आहे. लहानपणापासून सेल्वरानीहीला एका बैलाचे पालन करायचे होते. तमिळनाडूचा पारंपारिक खेळ जल्लीकट्टूमध्ये मोठ्या प्रमाणावर बैलाचा वापरला जातो. सेल्वरानीची अशी इच्छा होते की तीने पाळलेला बैलाने देखील बक्षिस जिंकावे. तिच्या याचा जिद्दीमुळे सेल्वरानीने कधीही लग्न केले नाही कारण तिच्या दोन्ही भावांकडे बैलाला सांभाळण्यासाठी वेळ नव्हता. या कारणामुळे सेल्वरानीने बैलाची सांभाळ करण्यासाठी कौटुंबिक सुखाचा त्याग केला.
bull2
सेल्वारानीन या बैलाचे नाव रामू ठेवले होते. सेल्वारानी रामूच्या सांभाळ करत शेतात काम ही करते. सेल्वरानी म्हणतात की, जेव्हा शांत स्वभावाचा रामू खेळाच्या मैदानात उतरतो तेव्हा आक्रमक होतो. रामूने गेल्या पाच वर्षांत प्रत्येक स्पर्धेत जिंकला आहे. बक्षिस म्हणून रामूला, घरात वापरण्यात येणारे वस्तू, सिल्क साडी आणि सोन्याचे नाणी मिळाले आहे. स्पर्धेत वारंवार जिंकल्यामुळे अनेक लोकांनी रामू विकत घेण्याची इच्छ व्यक्त केली. यासाठी लोकांनी मोठ्या पैशांचीही ऑफर केली, मात्र सेल्वरानीने रामूला विकण्यास नकार दिला.
bull4सेल्वरानी आणि बैल रामू यांच्यात एक अनोखे नाते आहे. व्यक्ती केवळ माणुसकीसाठी आपल्या सुखाचा त्याग करतो हे आज काळच्या जगात फारच कमी बघायला मिळते.

Leave a Comment