देशाला मोदींच्या अत्याचारापासून १०० दिवसात मिळेल मुक्ती – राहुल गांधी

combo
नवी दिल्ली – भाजपच्या अत्याचाराची देशातील जनता शिकार होत असून या अत्याचारापासून आणि अक्षमतेपासून येत्या १०० दिवसात भारत मुक्त होईल, असे राहुल गांधी म्हणाले. त्यांनी हे वक्तव्य नरेंद्र मोदींच्या टीकेला प्रत्युत्तर देताना केले आहे.

राहुल गांधी पुढे म्हणाले, की महाशय हा लाखो बेरोजगार युवकांचा आक्रोश आहे. उद्विग्न शेतकऱ्याचा आहे, शोषित दलित आणि आदिवासींचा आहे. बरबाद झालेले व्यवसायिक आणि पीडित अल्पसंख्यांकांचा आहे. तुमच्या अत्याचारापासून या सगळ्यांना सुटका हवी आहे. ते येत्या १०० दिवसात मुक्त होतील.

विरोधी पक्षांची बंगाल येथे सभा झाली. मोदींनी या सभेवर टीका केली होती. ही आघाडी भ्रष्ट, नकारात्मक आणि अस्थिरतेची आघाडी आहे. पूर्ण विरोधक एकत्र आले आहेत आणि वाचवा, वाचवा असा आक्रोश करत आहेत. अशी टीका मोदींनी केली होती. त्यांच्या टिकेला राहुल गांधींनी प्रत्युत्तर दिले.

व्हीडिओ कॉन्फरसिंगद्वारे नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील कोल्हापूर, हातकणंगले येथील नाकरिकांशी संवाद साधत होते. पंतप्रधान यावेळी म्हणाले, की धनशक्ती विरोधकांकडे आहे तर आमच्याकडे जनशक्ती आहे. हे सर्व पक्ष भ्रष्टाचारने बरबटलेले आहेत. तसेच, त्यांचा पक्ष घराणेशाहीला प्रोत्साहन देतो.

Leave a Comment