नीतीशकुमारांच्या मुस्लिम मंत्र्याकडून श्रीरामाचा जयघोष

Nitish-Kumar
बिहारमधील नीतीश कुमार सरकारमधील अल्पसंख्यक कल्याण आणि ऊस खात्याचे मंत्री खुर्शीद उर्फ फिरोज अहमद यांनी रविवारी
‘जय श्रीराम’ आणि ‘हर-हर महादेव’च्या घोषणा दिल्या. एवढेच नाही तर त्यांनी एका धार्मिक यात्रेत भागही घेतला. त्यामुळे ते परत चर्चेत आले आहेत.

राज्यातील पश्चिम चंपारण जिल्ह्यातील रामपुर्वा गावात एका नवीन मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा रविवारी झाला. यावेळी सुमारे 10 किलोमीटर लांबीची कलश यात्रा काढण्यात आली. या यात्रेत सहभाग झालेल्यांनी जेव्हा जय श्रीराम आणि हर हर महादेव, जय हनुमान अशा घोषणा दिल्या तेव्हा खुर्शीद यांनीही त्यात आवाज मिसळला.

कलश यात्रेत भाग घेताना खुर्शीद म्हणाले, की अशा धार्मिक अनुष्ठानांमुळे सर्व धर्मातील लोकांना एकत्र येऊन राहण्याची शिकवण मिळते. सर्वांना एकमेकांचा आदर करायला पाहिजे. बिहारसह संपूर्ण देशातील लोकांनी धार्मिक सद्भाव जपला पाहिजे तरच सभ्य समाज निर्माण होईल, असे ते म्हणाले.

खुर्शीद यांनी भाजप-जदय युतीचे सरकार बनल्यानंतर जुलै 2017 मध्येही श्रीरामाचा जयघोष केला होता. त्यामुळे मुस्लिम धर्मियांचा त्यांच्यावर रोष झाला होता. त्यावेळी त्या कृत्याबद्दल त्यांनी माफीही मागितली होती.

Leave a Comment