उत्तरप्रदेश कुंभमेळ्याद्वारे करणार तब्बल १.२ लाख कोटींची कमाई

kumbh-mela
नवी दिल्ली – उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सध्या कुंभमेळा सुरू असून उत्तर प्रदेश सरकारला या कुंभमेळ्यातून तब्बल १.२ लाख कोटींचा महसूल मिळण्याची शक्यता कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीकडून (सीआयआय) वर्तवली आहे. शिवाय तब्बल ६ लाख रोजगार कुंभमेळ्यातून निर्माण होणार असल्याची माहिती सीआयआयकडून देण्यात आली आहे.

१५ जानेवारी ते ४ मार्चदरम्यान उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये कुंभमेळ्याचे आयोजन करण्यात आला आहे. उत्तर प्रदेश सरकारकडून या ५० दिवस चालणाऱ्या सोहळ्यासाठी ४ हजार २०० कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश सरकारला यातून १.२ लाख कोटींचा महसूल मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय कुंभमेळाव्याच्या माध्यमातून राजस्थान, उत्तराखंड, पंजाब आणि हिमाचल प्रदेश राज्यांनाही फायदा होणार असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. कारण या राज्यांमधून कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात.

Leave a Comment