आजकालच्या युगात प्रत्येकाला शॉर्टकट पध्दतीने आपले नाव कमवायचे असते, मग त्यासाठी काहीही करावे लागले तरी बिनधास्त पणे केले जाते. सोशल मीडियावर सहज पणे व्हिडिओ व्हायरल होतात त्यामुळे अनेक लोक याचा वापर करतात. ट्विटरवर 60 सेकंदांमध्ये प्रसिद्धी मिळवीण्यासाठी वॉशिंग्टनच्या एका माणसाने अशाच प्रकारचे काम केले आहे. त्यामुळे आता त्याच्यावर अनेक निर्बंध घालण्यात आले आहे.
जहाजाच्या 11 व्या मजल्यावरुन तरुणाने मारली उडी, आजीवन घालण्यात आली बंदी
वॉशिंग्टनच्या 27 वर्षीय नोकोले नेदेव याने रॉयल कैरिबियन जहाजाच्या 11 व्या मजल्यावरून थेट समुद्रात उडी मारली. नेदेव यांनी याचा व्हिडिओ बनवून तो शेयर केला आणि त्यांच्या मित्रांनी या व्हिडिओला प्रोत्साहीत देखील केले. त्याचवेळी, रॉयल कॅरिबियन जहाजावर नेदेव आणि त्याच्या मित्रांवर आजीवन बंदी घातली आहे.
इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यासाठी नेदेवच्या मित्रांनी या संपूर्ण घटनेचा एक व्हिडिओ तयार केला. व्हिडिओमध्ये असे दिसते की, 27 वर्षीय नोकोले यांने रॉयल कॅरिबियन जहाजाच्या 11 व्या मजल्यावरून उडी मारली. दरम्यान, त्याचावेळी नेदेवचे मित्र त्याची स्तुती करताना दिसत आहेत. ही व्हिडिओ क्लिप आता जोरदार व्हायरल झाली आहे.
या धोकादायक स्टंटमुळे आता रॉयल कॅरिबियन जहाजावर नोकोल नेदेव आणि त्याच्या सर्व मित्रांवर आजीवन बंदी घालण्यात आली. असे म्हटले जात आहे की, नोकोलला या स्टंट नंतर पुन्हा जहाजावर येणार परवानगी देण्यात आली नाही. आंतरराष्ट्रीय जहाज कंपनीने याच्या विरोधात कायदेशीर कारवाई करीत आहे.