अत्याधुनिक क्षेपणास्त्रांसाठी फ्रान्ससोबत संरक्षण मंत्रालय करणार १ हजार कोटींचा करार !

missile
नवी दिल्ली – आपल्या सामर्थ्यात वाढ करण्यासाठी भारतीय भूदल फ्रांसकडून रणगाडा विरोधी मार्गदर्शित क्षेपणास्त्रे विकत घेण्याच्या तयारीत असून या क्षेपणास्त्राचे ‘मिलान २-टी, असे नाव आहे. संरक्षण मंत्रालयाचा जवळपास ३ हजार क्षेपणास्त्रे विकत घेण्याचा मानस आहे. जवळपास १ हजार कोटी रुपयांचा त्यासाठी करार होईल.

भूदलाला रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची आवश्यकता असल्याचे भारतीय लष्कराच्या एका अहवालामध्ये नमूद केले आहे. त्यावर विचार करुन ३ हजार मार्गदर्शित क्षेपणास्त्रे विकत घेण्याच्या तयारीत भारत आहे. मिलान २-टी हे क्षेपणास्त्र तिसऱ्या पिढीचे अत्याधुनिक क्षेपणास्त्र आहे.

जवळपास ७० हजार क्षेपणास्त्रांची भारतीय लष्कराला आवश्यकता आहे. त्यामध्ये ८५० प्रक्षेपकांचा समावेश आहे. भारताजवळ सध्या दुसऱ्या पिढीचे मिलान २-टी आणि कोनकूर्स क्षेपणास्त्र आहे. पण त्याची मारक क्षमता विकत घेत असलेल्या क्षेपणास्त्रापेक्षा कमी आहे. हे क्षेपणास्त्र भारत डायनामिक्स लिमिटेडने फ्रांसच्या मदतीने भारतामध्येच बनवले होते. त्याची मारक क्षमता २ किलोमीटर पर्यंत आहे.

Leave a Comment