राहुल गांधी यांची पोलखोल करू – हकालपट्टी झालेल्या नेत्याची धमकी

rahul-gandhi
काँग्रेसमधून नुकतीच हकालपट्टी करण्यात आलेल्या माजी केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ नेते श्रीकांत जेना यांनी पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांची पोलखोल करण्याची धमकी दिली आहे. ओडिशातील पटनाईक कुटुंब आणि खाण माफियासमोर त्यांनी आत्मसमर्पण केल्याची टीकाही त्यांनी केली.

राहुल गांधींना आपण एवढे उघडे पाडू, की त्यांना लोकांसमोर आपला चेहरा दाखविणे अवघड होईल, असे ते म्हणाले.
“मला आनंद होत आहे. की मी काँग्रेस पक्षात राहण्याच्या जबाबदारीतून मुक्त झालो आहे. मी राहुल गांधी यांना अनेक पत्रे लिहून विचारले होते, की ते पटनाईक बंधू आणि खाण माफियांच्या बाजूने आहेत की किंवा ओडिशाच्या लोकांबरोबर,” असे जेना पत्रकार परिषदेत म्हणाले.

“राहुल गांधींनी खाण माफिया आणि पटनाईक बंधुंच्या बाजूने राहणे पसंत केले. माझी हकालपट्टी झालेली नाही, तर माझा प्रस्ताव स्वीकारा किंवा मला पक्षाच्या जबाबदारीतून मुक्त करा, असे पत्र मी आधीच पाठवले होते. मला त्यांना उघडे पाडायचे होते मात्र त्यांनीच स्वत:ला उघडे केल,” असे ते म्हणाले.

कोरापूतचे माजी आमदार कृष्णचंद्र सागरिया आणि जेना यांना पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल ओडिशा काँग्रेसमधून काढून टाकण्यात आले आहे.

Leave a Comment