ही हत्तीण वाजवते चक्क ‘माऊथ ऑर्गन’

elephant
कोईम्बतूर – तमिळनाडू येथील कोईम्बतूर जिल्ह्यातील मंदिरांमधील हत्तींच्या पुनरुत्थानासाठी हे शिबीर आयोजित करण्यात आले असून हत्तींच्या पुनरुत्थान शिबिरातील हत्तीण चक्क ‘माऊथ ऑर्गन’ वाजवत असल्याने चर्चेत आली आहे. या हत्तीणीला पाहण्यासाठी आणि माऊथ ऑर्गन वादन ऐकण्यासाठी लोक गर्दी करत आहेत.

या हत्तीणीचे ‘लक्ष्मी’ असे नाव असून इरट्टाई तिरुपती मंदिरातील ती हत्तीण आहे. तिच्या सोंडेने ती माऊथ ऑर्गन वाजवते. हे वाद्य वाजविण्यास तिला शिकवणे कठीण होते. ५ माऊथ ऑर्गन तिच्याकडून मोडले गेल. पण हळूहळू ती वाजविण्यास शिकली. ती आता सलग १५ मिनिटे माऊथ ऑर्गन वाजवू शकते, असे मंदिरातील हत्तींच्या माहूताने सांगितले.

हत्तींना या शिबिरात शाही वागणूक मिळते. पोषणयुक्त आहार, औषधे त्यांना दिली जातात. त्यांना चांगली आंघोळ घातली जाते. तसेच, जलद चालण्यास शिकवले जाते. ४८ दिवसांचे हे शिबीर असून येथे हत्तींच्या प्रकृतीची काळजी घेतली जाते. विविध जंतुसंसर्गापासून वाचविण्यासाठी त्यांना औषधे दिली जातात. हत्तीपालन करणे या शिबिरामुळे अधिक चांगल्या प्रकारे होत असल्याचे विविध मंदिरांच्या हत्तींची देखभाल करणाऱ्यांनी सांगितले. तमिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांनी २००३ मध्ये केली होती.

Leave a Comment