रेल्वेत आता मातीच्या भांड्यातून मिळणार जेवण

clay-pot
नवी दिल्ली – आता मातीच्या भांड्यातून अन्नपदार्थ खाण्याची सवय कालबाह्य झाली असून तुम्हाला हा आनंद प्रवास करताना रेल्वे देणार आहे. प्रवाशांना मातीचे भांडे, ग्लासमधून अन्नपदार्थ, जेवण व पेय देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.


प्रवाशांना रेल्वेत अन्नपदार्थ देण्याची सेवा देण्यात येते. रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकचा वापर टाळण्याचा निर्णय घेतला. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. प्रवाशांना जेवण व पेय देण्यासाठी मातीची भांडे व मातीचे ग्लास देण्यात येणार आहेत. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी व कारागिरांना रोजगार देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. रोज रेल्वेतून कोट्यवधी प्रवासी भोजन सेवा घेत असल्याने कुंभारकाम करणाऱ्या कारागिरांना रोजगाराची मोठी संधी मिळणार आहे.

Leave a Comment