राहुल गांधींच्या व्यक्तिमत्वात प्रगल्भपणा – भाजप महिला खासदार

saroj-pande
डेहराडून – भाजपच्या खासदार सरोज पांडे यांनी राहुल गांधींच्या व्यक्तिमत्वात प्रगल्भपणा (मॅच्युरिटी) दिसून येत असून त्यांच्या वागण्यातून प्रगल्भतेच्या काही खुणा जाणवत असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी देखील राहुल गांधींना पांडे यांनी ‘मंदबुद्धी’ असे संबोधले होते.

छत्तीसगडमधून पांडे या राज्यसभेच्या खासदार आहेत. त्यांना काँग्रेस अध्यक्षांच्या सध्याच्या व्यक्तिमत्त्वाबाबत प्रश्न विचारला असता हे उत्तर पांडेंनी दिले. व्यापमं घोटाळ्याच्या नावाने काँग्रेसने भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे. ते एक राजकीय षड्य़ंत्र असल्याचे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. भाजपचा या भ्रष्टाचारामध्ये समावेश नव्हता. काँग्रेसने त्यानंतर राफेल घोटाळा शोधून काढला, असेही पांडे म्हणाल्या.

पांडे यांनी यापूर्वी दुर्ग येथे जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधींना मंदबुद्धी संबोधले होते. शिकण्याचा नक्कीच राहुल प्रयत्न करत आहेत. पण काही शिकण्याचे एक वय असते. जो व्यक्ती ४० वर्षे वयानंतर काहीतरी शिकू पाहतो, त्याला शिक्षण म्हणता येत नाही. अशा माणसांना मंदबुद्धीच म्हटले जाते, अशी टीका पांडे यांनी राहुल गांधींवर केली होती.

Leave a Comment